नगर- मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कला-गुणांना प्रोत्साहन दिल्यास त्याचा अभ्यासावरही चांगला परिणाम होवून व...
नगर- मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कला-गुणांना प्रोत्साहन दिल्यास त्याचा अभ्यासावरही चांगला परिणाम होवून विद्यार्थी प्रगती करु शकतात. त्यांच्या मनातील भावांना ओळखून हसत-खेळत शिक्षण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरु शकते. यासाठी पॅरामाऊंट अॅकॅडमीच्यावतीने अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना जो वाव दिला जातो, तो निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आर्मी पब्लिक स्कूलच्या माजी शिक्षिका अर्चना देशपांडे यांनी केले.
पॅरामाऊंट अॅकॅडमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










