नगर - श्री लक्ष्मीनारायण मंदिरात स्वकुळ साळी हित संवर्धक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. विश्वस्त प्रमुख लक्ष्मीकांत तर...
नगर - श्री लक्ष्मीनारायण मंदिरात स्वकुळ साळी हित संवर्धक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. विश्वस्त प्रमुख लक्ष्मीकांत तरोटे, अध्यक्ष सौ.वनीता पाटेकर, सेक्रेटरी गजेंद्र सोनवणे व खजिनदार कृष्णा बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही संभा संपन्न झाली. या सभेमध्ये नूतन विश्वस्त प्रमुखपदी संजय प्रभाकर सागांवकर यांची तर कार्यकारिणी अध्यक्षपदी बाबासाहेब उत्तमराव वैद्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समीर पाठक यांनी याप्रसंगी सूचना मांडली, कृष्णा बागडे व अशोक मानकर यांनी त्यास अनुमोदन दिले.
या निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात येवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात समाजाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी आपण आपला चांगला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले. या सर्वसाधारण सभेस उमेश कोदे, जितेंद्र लांडगे, सुधाकर अडसुळ, विक्रम पाठक, अनिल भंडारे, सौ.छाया साळी, सौ.सुरेखा शेकटकर, सचिन मडके, सुनिल पावले, प्रमोद अष्टेकर, सुरेश इंगळे, संजय दळवी, चंद्रकांत मानकर, नारायण मिसाळ, सतीश झिकरे, योगेश भागवत, तुकाराम मोडक आदि कार्यकारिण सदस्य उपस्थित होते. शेवटी लक्ष्मीकांत तरोटे यांनी आभार मानले.









