श्रीगोंदा - अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रय़त्न झाल्याची घटना तालुक्यातील निमगांव खलु येथे घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्य़ादीवरुन...
श्रीगोंदा - अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रय़त्न झाल्याची घटना तालुक्यातील निमगांव खलु येथे घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्य़ादीवरुन पोलीसांनी गोट्या उर्फ रविंद्र बाळासाहेब करनोर याच्याविरुध्द भादवि कलम 376/511 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रविवार 3 एप्रिल 2016 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास गोट्या उर्फ रविंद्र बाळासाहेब कटनोर याने त्याच्या राहत्या घरी फिर्य़ादी पिडीत मुलीस बोलावून दार बंद करुन तिच्यावर बलात्काराचा प्रय़त्न केला. श्रीगोंदा पोलीसात करनोर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर तो फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तापस पोलीस उपनिरिक्षक राजेश मनतोडे हे करीत आहेत.










