नगर:-शिक्षत व्हा, चळवळी करा, संघटीत व्हा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. धर्म व सामाजिक बाबी दूर ठेवा आणि शिक्षण व राजसत्ता ...
नगर:-शिक्षत व्हा, चळवळी करा, संघटीत व्हा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. धर्म व सामाजिक बाबी दूर ठेवा आणि शिक्षण व राजसत्ता मिळविण्यासाठी आपली बुद्धी खर्च करा. बहिष्कृत वर्गाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच नि:संशय पहिला व सर्वात महत्वाचा उपाय आहे. शिका, संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध लढा’ आज कित्येक देशात महिलांना मतदानाचे स्वातंत्र्य नाही. मात्र ज्यावेळी डॉ.आंबेडकरांनी संविधान बनवले, तेव्हा त्यांनी प्रत्येक सज्ञान व्यक्तीस मतदानाचा अधिकार दिला, बाबासाहेबांमुळे मिळालेल्या या मुलभूत स्वातंत्र्याचा प्रत्येकाने जबाबदारीने उपयोग करुन त्याबरोबर आपले कर्तव्यही पार पडले पाहिजे, असे प्रतिपादन केडगांव येथे भाजप मंडलाचे अध्यक्ष साहेबराव विधाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चोरडिया यांनी केले. तर आभार बाळासाहेब पाटोळे यांनी मानले.









