1707 नगर - समाजकार्य करीत असताना विघ्नसंतोषी लोक कामांत अडथळा आणत असतात. हे अडथळे पार करत मोठी कसरत करीत मोफत रुग्णालय सुरू करण्यात मल...
नगर - समाजकार्य करीत असताना विघ्नसंतोषी लोक कामांत अडथळा आणत असतात. हे अडथळे पार करत मोठी कसरत करीत मोफत रुग्णालय सुरू करण्यात मला यश आले. हे यश मिळविताना सर्व पक्षातील गटनेत्यांनी मला पाठबळ देऊन हे रुग्णालय सुरू करण्यासाठी सहकार्य केले. मोफत रुग्णालय सुरू झाल्याने रुग्णांची चांगली सोय होणार आहे. 25 वर्षे मी राजकारणाबरोबरच समाजकारण करीत आहे. समाजाची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे मला कोणी संपवू शकले नाही, असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केले.शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने महाले मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मोफत रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डागवाले बोलत होते. याप्रसंगी मनपा आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, संजय झिंजे, जालिंदर बोरुडे, रोहन लेंडकर, रोहन डागवाले, विशाल भालेराव, आशाताई डागवाले, सुभाष दारवेकर, शहाजी डहाळे उपस्थित होते.










