निघोज मध्ये काही दिवसापूर्वी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आले होते या मतदानाला काही तांत्रिक गोष्टींना सामोरे जावे लागले होते ता...
निघोज मध्ये काही दिवसापूर्वी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आले होते या मतदानाला काही तांत्रिक गोष्टींना सामोरे जावे लागले होते तांत्रिक गोष्टींनमुळे काही महिलांना मतदान करता आले नाही म्हणून उभी बाटली हि उभीच राहील होती पण नुकत्याच औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या फेरमतदानयाच्या निर्णयामुळे दारूबंदीसाठी काम करणाऱ्या महिलांचा विजय झाल्याची भावना महिलांमध्ये आहे या निर्णयाचे महिला व कार्यकर्त्यांकडून मंगळवारी फटाके फोडून स्वागत करण्यात आले तसेच नवसपुरतीसाठी तहसीलदार सौ भारती सागरे यांच्या हस्ते मळगंगा देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली सकाळी 11 वाजता तहसीलदार सौ भारती सागरे यांनी देवीच्या मंदिरात या धार्मिक कार्यक्रमानंतर दारूबंदी चळवळीतील महिला व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच ठकरामशेठ लंके ,दारूबंदी चळवळीचे प्रणेते बबनराव कवाद, डॉ,महेंद्रकुमार झावरे, प्रशांत वराळ, मळगंगा पतसंस्थेचे संचालक विठ्ठल वरखडे, भास्कर कवाद, संतोष रसाळ,शिवाजीमहाराज लामखडे, राहुल वराळ, वैभव वराळ, दिलीप कवाद,प्रा ज्ञानेश्वर कवाद,मोहन कवाद, शिवाजी क्षीरसागर, तुकाराम तनपुरे,महादेव भुकन, भानुदास साळवे, दशरथ साबळे, मीराबाई वरखडे, पुष्पाताई वराळ, कांता लंके, शालन कवाद, शांताबाई भुकन, सुरेख खोसे, आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार भारती सागरे म्हणाल्या कि दारूबंदीसाठी फेरमतदान हा एक ऐतिहासिक निर्णय असून महिलांनी पाठपुरावा केल्यानेच हे शक्य झाले महिलांनी संघटित होऊन उभारलेली हि चळवळ कौतुकास्पद आहे महिला अश्याच सक्रिय राहिल्यास निघोजच नाही तर राज्यातही दारूबंदीसाठी बळ मिळेल जेष्ठ समाजसेवक अना हजारे यांनी अश्याच चळवळीतून काम केले आहे तश्याच प्रकारे निघोजच्या महिला पण यशस्वी ठरतील असा विश्वास व्यक्त केला दारूबंदी चळवळीचे प्रणेते बबनराव कवाद यांनी औरंगाबाद न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली या पुढच्या प्रत्येक चळवळीत महिलांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे ते म्हणाले, तहसीलदार भारती सागरे यांच्या हस्ते दारूबंदीतील महिला व कार्यकर्त्यांना "जीवांविद्या मिशन "चे सदगुरु वामनराव पै यांचे पुस्तक देऊन सत्कार केला ,यावेळी सूत्रसंचालन भास्करशेठ कवाद यांनी केले तर अनिल लंके यांनी आभार मानले,










