नगर - समाजविकासाच्या क्रांतीची सुरुवात थोर समाज सुधारक विश्वरत्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्यातूनच झाली आहे. सामाजि...
नगर - समाजविकासाच्या क्रांतीची सुरुवात थोर समाज सुधारक विश्वरत्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्यातूनच झाली आहे. सामाजिक संस्थांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचा विकास साध्य करतांना सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करतांना महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेवक किशोर डागवाले यांनी केले.
नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव, ऍड.अनिता दिघे, गजेंद्र राशिनकर, रमेश सानप, जालिंदर बोरुडे, विनायक नेवसे, प्रसाद भडके, अमोल कोठारी, आदेश जाधव, मुरलीधर नजान, पुरुषोत्तम पटेल, सुरज जाधव, नरसिंह पटेल, दिनेश जोशी, विशाल जाधव, कुणाल गवळी, रविंद्र जाधव, रोहित व्यवहारे, अक्षय आंबेकर, गोरे, अनाप आदि उपस्थित होते.









