नगर- पवननगर येथील श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंस...
नगर- पवननगर येथील श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतप्रमुख नानासाहेब जाधव, आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव कानडे, माजी नगरसेवक दिगंबर ढवण, निखिल वारे, श्रीराम सेवा समितीचे प्रशांत भालेराव, शिवाजीराव चव्हाण,राम कथा प्रवत्या ह.भ.प. रुमिणीआई तारु महाराज यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते. दुपारी 1 ते 4 महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 वाजता डॉ.बापुसाहेब कांडेकर व डॉ.नितीन साळंके यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली. तर रात्री 8 वाजता गुरुभक्त ह.भ.प. संदिप महाराज खोसे यांचे हरिकिर्तन झाले. कार्यक्रमास पवननगर, गोकुळ नगर, नंदनवन नगर, दत्तनगर, तुळजानगर, साईराम नगर, कुशाबानगरी व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









