नगर - हिंदूधर्मीय गुढीपाडव्याचा सण हा नवीन वर्ष म्हणून साजरे करतात. नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते. यंदाचा उत्सवही विविध कार्...
नगर - हिंदूधर्मीय गुढीपाडव्याचा सण हा नवीन वर्ष म्हणून साजरे करतात. नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते. यंदाचा उत्सवही विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मियांनी ही उत्सव धूमधडाक्यात साजरा करावा, यासाठी शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर डागवाले यांनी दिली.
गुढीपाडव्यानिमित्त 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता रंगार गल्ली येथे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच हॅपी मेडिकेअर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. यामध्ये पारंपरिक सण, उत्सव, लावणी, गण, महाराष्ट्राची लोककला व लोकनृत्य सादर होईल. यामध्ये सुमारे 50 कलाकारांचा सहभागी होऊन कला सादर करतील. यासाठी भव्य सेट उभारण्यात आला आहे.










