मुंबई - स्वतंत्रविदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत मांडण्यात आलेला अखंड महाराष्ट्र...

मुंबई - स्वतंत्रविदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत मांडण्यात आलेला अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव अखेर विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनापर्यंत पुढे ढकलण्यात आला. याबाबत सांगोपांग विचार करावा लागणार असून त्याबाबत विधि न्याय खात्याचे मत घेऊन कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा ठराव पुढील अधिवेशनात येईल, असे सभापतींनी जाहीर केले. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश, विदर्भासह अखंड महाराष्ट्र निरंतर कायम ठेवण्याची शिफारस ही विधान परिषद शासनामार्फत राज्यपाल केंद्र शासनास करीत आहे, अशा आशयाचा ठराव शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दहा दिवसांपूर्वी सभापतींकडे दिला होता. याच विषयावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही स्वतंत्र ठराव दिला होता.









