शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले पूर्णवाद परिवाराच्या पॉलिटिकल सायन्स अकादमीतर्फे पारनेर येथे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना ...
शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले पूर्णवाद परिवाराच्या पॉलिटिकल सायन्स अकादमीतर्फे पारनेर येथे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना युवक क्रांतीवीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार विजय औटी, आसामचे वनपुरुष जादव मोलाई पाइंगे, शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर, डॉ. विजय पागे, कृषी संचालक जयंत देशमुख, अँड. गुणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर, अँकेडमीचे अध्यक्ष अँड. राहुल संत. अहमदनगर : राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. सत्तेत असो की विरोधात, जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. सत्तेपेक्षा शिवसेना आता जनतेच्या प्रश्नांसाठी काम करीत आहे,असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पूर्णवाद परिवारातर्फे ठाकरे यांना शनिवारी पारनेर येथे युवक क्रांतीवीर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले, राज्यात युतीची सत्ता असलीतरी शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. फक्त शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काम चांगले आहे का? यावर त्यांनी मौन बाळगले. ते म्हणाले. आम्ही फक्त काम करतो. पारनेर येथे फक्त आशीर्वाद घेण्यासाठीच आलो आहे. लोकांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे अजिबात गैर नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना लढते आहे,विरोधक म्हणून नव्हे. आंदोलनातून जनतेची भूमिका मांडत आहोत. सत्काराला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मी कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्काराने काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. जगातील सर्व क्रांती, संशोधन १५ ते २५ या वयोगटातील तरुणांनीच केल्या आहेत. आई-वडील-आजोबा आणि शिवसैनिक यांच्याशिवाय मी शून्य आहे. अन्न-पाणी- पर्यावरणावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. आगामी काळात पाण्यावरून महायुद्ध होऊ शकते. मराठवाडा-विदर्भात दुष्काळ मोठा आहे. तिथे पाणी कसे पोहचवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे.










