नगर - नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 106 वर्षांपूर्वी बँकेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने...
नगर - नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 106 वर्षांपूर्वी बँकेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने बँक स्थापन केली; त्याच मार्गावर बँक काम करत आहे. बँकेच्या हजारो सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी बँकेवर विश्वास टाकल्यानेच बँक आज प्रगतीच्या पथावर आहे. या विश्वासाच्या बळावर बँकेने नुकतेच 1 हजार कोटींचे उद्दीष्ट पार केले आहे. यापुढील काळातही या विश्वासाला पात्र राहत सर्वसामान्यांची सेवा बँकेर्मोर्ंत होणार आहे. बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी, ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा व सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचार्यांचाही मोठे योगदान बँकेच्या या यशामध्ये आहे, असे प्रतिपादन अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन शैलेश मुनोत यांनी केले.
बँकेच्या सर्व 48 शाखांमध्ये हा वर्धापन दिन साजरा झाला. शहरातील मुख्य कार्यालयात सकाळपासून येणार्या प्रत्येक ठेवीदार, कर्जदार व नागरिकांना गुलाबपुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन शैलेश मुनोत, ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा, किशोर बोरा, अजय बोरा, ऍड.केदार केसकर, मनिष साठे, बँकेचे सर व्यवस्थापक नवीन गांधी, सह व्यवस्थापक सतीश शिंगटे, सतीश रोकडे, एम.पी.साळवे, डि.के.साळवे, विलास बडवे, मनिष मुंदडा, अशितोष देवी, श्रीकांत साठे, आदिंसह नागरिक उपस्थित होते. या 106 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेचे सभासद अशितोष देवी यंानी बँकेत 2 लाखांच्या ठेवींचा धनादेश सुवालाल गुंदेचा यांच्याकडे सुपूर्द केला.









