पारनेर : जग सुंदर आहे, परंतु मनातील भेदभाव व दुसऱ्याविषयी असलेली दुर्बुध्दी जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत सुंदर जग दिसत नाही. त्य...
पारनेर : जग सुंदर आहे, परंतु मनातील भेदभाव व दुसऱ्याविषयी असलेली दुर्बुध्दी जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत सुंदर जग दिसत नाही. त्यासाठी प्रत्येकाने मनातील धूळ प्रथम दूर करावी. मुलांवर चांगले संस्कार करावे. ज्यामुळे पुढील पिढी सुसंस्कारीत होईल, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. मळगंगा डेअरी फार्म (कन्हैय्या दूध) या संस्थेच्या १९ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त निघोज (ता. पारनेर) येथे आयोजित 'कीर्तन महोत्सव २0१६' मध्ये मंगळवारी ते बोलत होते.
यावेळी पं. स. सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, पं. स. सदस्य अनिता आढाव, किसन सुपेकर, अमृता रसाळ, तुषार शिवले, सहय़ाद्री डेअरीचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, 'धनलक्ष्मी'चे अध्यक्ष बाबासाहेब येवले, शिवगंगा दूध संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ दाते हजर होते. बुधवारी सायंकाळी ७ ते ९ यावेळेत ज्ञानेश्वर माउली कदम (आळंदी) यांचे कीर्तन होईल.










