नगर - प्रभाग 24 मध्ये शहराचा मध्यवर्ती परिसर येतो. या परिसरात अनेक वर्षापूर्वी गटार व जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र, वाढत्या...
नगर - प्रभाग 24 मध्ये शहराचा मध्यवर्ती परिसर येतो. या परिसरात अनेक वर्षापूर्वी गटार व जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. ही झालेली कामे कुचकामी ठरू लागली. त्यामुळेच नव्याने व वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पुन्हा गटारीची व जलवाहिनी टाकण्याची कामे करावी लागली. विकासकामे करताना प्रभागातील नागरिकांचे चांगले सहकार्य लाभते, असे प्रतिपादन नगरसेविका नीता घुले यांनी केले.
प्रभाग 24मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व नगरसेविका नीता घुले यांच्या प्रयत्नातून फर्ग्ग्युसन गेट येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ महिला ताराबाई बेल्हेकर यांच्या हस्ते, तसेच दळवी गल्ली येथे बंद पाईप गटार, जलवाहिनी व कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रा. सीताराम दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घुले बोलत होत्या.










