श्रीगोंदा - श्रीगोंदा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची पतसंस्था अहमदनगर या संस्थेच्या संचालकपदी राजु परदेशी यांची निवड झ...
श्रीगोंदा - श्रीगोंदा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची पतसंस्था अहमदनगर या संस्थेच्या संचालकपदी राजु परदेशी यांची निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुका शिक्षक संघाच्या वतीने परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शि. संघ नगरचे सरचिटणीस संदीप मोटे, गोवर्धन दरेकर, भाऊसाहेब दातीर, सुपेकर महाराज, संजय गायकवाड, दिपक डोळे, रविंद्र वाव्हळ, पांडुरंग शिंदे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पाटबंधारे व सा. बा. खाते कर्मचा-यांची पतसंस्था अहमदनगर या संस्थेच्या निवडणुकीत सुदाम झुंजरूक व राजु परदेशी यांचा पूर्ण पॅनल निवडून आल्याबद्दल झुंजरूद व परदेशी यांचे अभिनंदन होत आहे. शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या नुकताच सत्कार करण्यात आला.










