नगर - हिंदू धर्मात गायीला मोठे महत्त्व आहे. गायीच्या पोटात 36 कोटी देव वास करतात. गाय ही पूजनीय आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन ...
नगर - हिंदू धर्मात गायीला मोठे महत्त्व आहे. गायीच्या पोटात 36 कोटी देव वास करतात. गाय ही पूजनीय आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन धोक्यात आले आहे. गायींना चारा उपलब्ध नाही. त्यामुळेच चौपाटी कारंजा येथील क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानने श्रीरामनवमीचे औचित्य साधून निंबळक निसर्गसृष्टी गोपालन संस्थेतील गायींना चारा देण्याचा उपक्रम हाती घेतला, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोचूघोळ यांनी सांगितले.
श्रीराम नवमीनिमित्त चौपाटी कारंजा येथील क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्या वतीने निंबळक निसर्गसृष्टी गोपालन संस्थेतील गायींना चारा देण्यात आला. यावेळी श्री. बोचूघोळ बोलत होते. याप्रसंगी निकेश बावीस्कर, वैभव तापकिरे, प्रणिल बोगावत, प्रसन्न बीडकर, राहुल आडेप, गणेश मारवाडे, गणेश दळवी, चैतन्य जोशी, चैतन्य मडके, मंगेश दराडे आदी उपस्थित होते.










