केंद्रीय अर्थ संकल्प सादर होण्यापुर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याज दरात कपात व्हावी असे संकेत दिले होत...
केंद्रीय अर्थ संकल्प सादर होण्यापुर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याज दरात कपात व्हावी असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर कपात होणारच होती, मात्र पाव कि अर्धा टक्का? इतकाच प्रश्न होता.
आज रिझर्व्ह बँकेचे राजन यांनी व्याजदर (रेपो रेट) पाव टक्यांनी कमी केल्याचे जाहीर केले. यामुळे कर्जदारांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी व्याजदरातील कपातीची घोषणा होताच शेअर बाजार जवळपास ४५० अंकानी घसरला.
सध्या महागाई दर स्थीर आहे. विकास दरही समाधानकारक स्थितीत आहे म्हणून ही कपात करण्यात आल्याचे राजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
दरम्यान रेडीरेकनर दर ७ टक्यांनी आधीच वाढल्याने गृह कर्जदारांमध्ये नाराजी जाणवते हे इथे उल्लेखनीय .










