नगर- अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रक्तस्त्राव जास्त होतो अशा वेळी रक्ताची गरज भासते. त्यावेळी कळत-नकळत केलेल्या रक्तदानामुळे एखाद्य...
नगर- अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रक्तस्त्राव जास्त होतो अशा वेळी रक्ताची गरज भासते. त्यावेळी कळत-नकळत केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचते. रक्तदानाने पुण्यकमार्चचे महत्व वाढते असे प्रतिपादन मानवाधिकार जनआंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड यांनी केले.
झोपडी कॅन्टीन मित्र मंडळ व मानवाधिकार जन आंदोलन संघटना यांच्या वतीने आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी 63 युवकांनी रक्तदान केले. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड.गायकवाड बोलत होते. ते पुढे म्हणाले. दान केल्याने पुण्य वाढते मग नेत्रदान करा, देहदान करा, अन्नदान करा, रक्तदान करा या दानामुळे मानवाला समाधान मिळते शिवाय पुण्यकर्म वाढते युवकांनी असे उपक्रम राबवून रक्तदानाचे पवित्र कार्य करावे. झोपडी कॅन्टीन मित्र मंडळ व मानवाधिकार जन आंदोलन संघटना यांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते म्हणाले.










