श्रीगोंदा - पुणे-नगर जिल्हा सीमेवरील दौंड जवळील भीमा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असून गेल्या काही वर्षात हे बहुधा पहिल्यांदाच घडल्याचे म...
श्रीगोंदा - पुणे-नगर जिल्हा सीमेवरील दौंड जवळील भीमा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असून गेल्या काही वर्षात हे बहुधा पहिल्यांदाच घडल्याचे म्हटले जाते. एप्रिल संपण्यापु्र्वी पात्र कोरडे पडले आहे. पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी या पात्रात सो़डल्यानंतर भीमा नदीपात्र तद्नंतर पानगळ व वनस्पतीने भरते व उन्हाळ्यातही बऱ्यापैकी पर्जन्यमानामुळे दुष्काळ पडला असून नदीचे पात्र कोऱडे पडले आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना देखील पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तर नदीच्या वरील भागात मात्र बंधाऱ्याचे पाणी अडविल्याने काही गावात हिरवाई आहे.










