श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात सापडलेल्या दूचाकी वाहनांमुळे आवारात अस्वच्छता तर आहेच परंतु वापराविना वाहने पडून राहिल्याने ...
श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात सापडलेल्या दूचाकी वाहनांमुळे आवारात अस्वच्छता तर आहेच परंतु वापराविना वाहने पडून राहिल्याने वाहने खराब झाली असून अनेक वाहनांच्या सुट्या भागांना पाय फुटल्याचे बोलले जात आहे. यातील अनेक वाहने सुस्थितीत असली तरी वापराविना पडून राहिल्याने दुर्दशा होत आहे.
या वाहनांचा लवकर लिलाव व्हावा असे नागरिकांत बोलले जात आहे. आवारातील मोठी जागा या दूचाकी व चार चाकी वाहनांनी व्यापल्याने अनेक हवालदारांनी आपल्या बिटाचे कामकाज पोलिस ठाण्यापासून दूर असलेल्या जुन्या तहसिल कार्यालयात बसून सुरु केले आहे. ही वाहने अन्यत्र हलविण्याची मागणी होत आहे.










