नगर-गुजरगल्लीतील आदेश्वर भगवान जैन मंदिराच्या प्रतिष्ठेनिमित्त नुतन श्री.वासुपुज्य भगवानांच्या भव्य मुतींची रविवारी (दि.24 ) शहरातून ...
नगर-गुजरगल्लीतील आदेश्वर भगवान जैन मंदिराच्या प्रतिष्ठेनिमित्त नुतन श्री.वासुपुज्य भगवानांच्या भव्य मुतींची रविवारी (दि.24 ) शहरातून अतिभव्य दिक्षा कल्याणक वरघोडा मिरवणुक काढण्यात आली. अंजनशलका विधी निमित्त रविवारी दिक्षा कल्याणक सोहळा संपन्न झाला. चंपापुरी (क्लेरा ब्रुस) नगरीत वासुपुज्य भगवांनाचा विवाह सोहळा, त्यानंतर दिक्षा सोहळा शानदार पद्धतीने झाला. उपस्थितांना हजारो वर्षांपुर्वीच्या वातावरणाचा अनुभव या सोहळ्याने आला.
पुज्य आचार्य जगवल्लभ सुरींजी पुज्य आचार्य हर्षवल्लभ सुरीची पंन्यास दर्शनवल्लभ विजयजींच्या उपस्थितीत श्री वासुपुज्य भगवानांसह सर्वनूतन प्रतिमांची सुशोभित रथातून यावेळी मिरवणुक काढण्यात आली.









