नगर - सध्या नोकरी मिळणे अवघड होत चालले आहे. असंख्य तरुण पदवीधर होऊनही नोकर्या मिळत नसल्याने बेकार आहेत वाढत्या लोकसंख्येमुळे उद्योग व्यव...
नगर - सध्या नोकरी मिळणे अवघड होत चालले आहे. असंख्य तरुण पदवीधर होऊनही नोकर्या मिळत नसल्याने बेकार आहेत वाढत्या लोकसंख्येमुळे उद्योग व्यवसायाला आत्ता तरुणवर्ग जास्त पसंती देतो. व्यवसायाला, प्रामाणिकपणा व विश्वासाची जोड मिळाली कि यश निश्चित मिळते असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती ऋषिजी कपूर यांनी केले.
सावेडी उपनगरातील कृष्ठधाम रोडवर क्रिम दी फिएस्टा स्पेशालिटी बेकर्स चा शुभारंभ पाडव्याला श्री. कपूर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक प्रभाकर येनगूल, श्रीनिवास येनगूल, विशाल संभार, शब्बीर शेख, अश्विन सातपुते आदि उपस्थित होते.









