श्रीगोंदा- नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांच्यावर नोंदविलेला (कलम 509) खोटा गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी म...
श्रीगोंदा- नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांच्यावर नोंदविलेला (कलम 509) खोटा गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी महिलांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढला होता. या मोर्चात शेकडो महिला तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. सध्या सर्वत्र जाणवत असलेली पाणीटंचाई त्यावर मात करण्याच्या दृष्टीने उपनगराध्यक्ष अख्तर शेख हे मुलांसह शहराला मोफत पाणी देत मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना हे सहन होत नसल्याने त्यांनी महिलांना पुढे करून अख्तर शेख व अलीम शेख यांनी महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलिसात दाखल करण्यास भाग पाडले. आज शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उपनगराध्यक्ष अख्तर शेख व त्यांचा मुलगा अल्ताफ शेख यांनी तुला पाणी देणार नाही, कुठे जायचे तिथे जा, काय करायचे ते कर असे अर्वाच्य भाषेत खालच्या पातळीवर शिव्या देऊन मुडदा पाडू अशी धमकी देऊन लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करून शिवीगाळ केल्याची फिर्याद शोभा खामकर या प्रभाग क्र. 3 मधील महिलेने दिल्याने अख्तर शेख व अल्ताफ शेख यांच्यावर भा.दं.वि. 509, 506, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे समजताच शहरातील व त्याच प्रभाग 3 मधील महिलांनी एकत्रित येऊन तहसील कार्यालयावर मोर्चाने जावू व हा खोटा गुन्हा मागे घेण्याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेतला व अवघ्या काही मिनीटातच शेकडो मिहलांनी मोर्चाने एकत्रीत येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रा. तुकाराम दरेकर व सतिष पोखर्णा यांनी एका प्रमाणिक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याची चौकशी करून तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा खोटा गुन्हा दाखल करणा-याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला. तहसीलदार वंदना खरमाळे यांनी निवेदन स्विकारले तर पो.नि. सोमवंशी यांनीही याबाबत तातडीने चौकशी
करून योग्य कारवाई केली जाईल अख्तर शेख यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले. यावेळी नगरसेवक भरतकुमार नहाटा, सुनिल वाळके, डॉ. अनिल घोडके, ऋषिकेश गायकवाड आदिंसह सामाजिक कार्यकर्त्यांना अन्याय असल्याचे सांगून हा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.











