नगर- जैन सोशल फेडरेशन व धार्मिक परिक्षा बोर्ड आयोजित आनंदधाम येथे आनंद बालसंस्कार शिबीर सुरु असून 600 मुला-मुलींनी या शिबीरात भाग घेतल...
नगर- जैन सोशल फेडरेशन व धार्मिक परिक्षा बोर्ड आयोजित आनंदधाम येथे आनंद बालसंस्कार शिबीर सुरु असून 600 मुला-मुलींनी या शिबीरात भाग घेतला आहे. या शिबीरात प्रार्थना ऐरोबिक्स पथनाट्य, धार्मिक शिक्षक संगीत असे अनेक विषय शिकविले जातात. शिवाजी नाईकवाडी यांचे व्यक्तीमत्व विकासासंदर्भात मार्गदर्शन होते. सर्व साधू-साध्वीजी मुलांना धार्मिक ज्ञान देतात. सर्वात शेवटी मुलांना नास्ता व खाऊ दिला जातो.
पू.श्री आदर्शऋषीजी महाराज साहेबांचे मार्गदर्शनाने शिबीराची समाप्ती होते. गीतांच्या स्वरांनी आनंदधाम गुंजून उठते. उद्या रविवारी संध्याकाळी कार्यशाळेतील मुलांचा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सायं. 6 वा आनंदधाम येथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिबीराच्या संचालिका सौ.सरोज कटारिया यांनी केले आहे.









