Archive Pages Design$type=blogging

सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून 'वीज बिल मुक्ती'कडे पाऊल टाकण्याचा निर्णय

नगर -ऊज्रेची वाढती मागणी लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. जिल्हा परिषद मुख...



नगर -ऊज्रेची वाढती मागणी लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीचा वीज प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी ३0 किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची फाईल मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. सरकारकडून या प्रकल्पासाठी ३0 टक्के सबसिडी देण्यात येत आहे. भविष्यात हा प्रयोग ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय या ठिकाणी राबवण्यात येणार असून त्या ठिकाणचे वीज बिल बंद अथवा अल्प प्रमाणात करून घेण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे.यासाठी मुबलक प्रमाणात असणार्‍या सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून पारेषण विरहित ऊर्जा प्रकल्प राबवण्यास सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यालयात हा प्रयोग राबवून 'वीज बिल मुक्ती'कडे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर कर्जत पंचायत समितीच्या इमारतीत हा प्रयोग राबवण्यात येत आहे. बँकिंग ऑफ इलेक्ट्रीसीटीवर आधारित हा प्रयोग असून सौर ऊज्रेपासून वीज निर्मिती करण्यात येत आहे. त्यानंतर ती वीज वितरणला देऊ, त्यांच्याकडून गरजेनुसार वीज घेण्यात येत आहे. कर्जत पंचायत समितीच्या इमारतीत सौर ऊर्जेवर आधारित दररोज १0 किलोवॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. यातून ५0 युनिट विजेची निर्मिती होत असून ही वीज मीटर लावून एमएसईबीला (महावितरण) देण्यात येत आहे. यातून पंचायत समितीला आवश्यक असणारा विजेचा पुरवठा होत आहे. यामुळे कर्जत पंचायत समिती इमारतही 'वीज बिल मुक्त' झाली आहे. या प्रकल्पासाठी १३ ते १४ लाख रुपये खर्च आला आहे. जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्यातील उर्वरित १३ पंचायत समिती इमारतीत हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून 'वीज बिल मुक्ती'कडे पाऊल टाकण्याचा निर्णय
सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून 'वीज बिल मुक्ती'कडे पाऊल टाकण्याचा निर्णय
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCVl-fkx-3c-07g7CDoK9H9u-udSVvo8aBg-z2zcHUmXhy87FtwNMe2VbZSSKmBIv59pOO5GIrBZue_9hRZxHn8P22kmybn7gkQi52vGU8D68pdaaaTDABh7w2isCQX84VazW1ikfoN29z/s1600/images.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCVl-fkx-3c-07g7CDoK9H9u-udSVvo8aBg-z2zcHUmXhy87FtwNMe2VbZSSKmBIv59pOO5GIrBZue_9hRZxHn8P22kmybn7gkQi52vGU8D68pdaaaTDABh7w2isCQX84VazW1ikfoN29z/s72-c/images.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_941.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_941.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago