पारनेर - निर्मलग्राम गारगुंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला रामनवमीला सुरुवात झाली. सप्ताहामध्ये ८ दिवस हरिकीर्तन, तसेच नवीन उपक्रम म्हणू...
पारनेर - निर्मलग्राम गारगुंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला रामनवमीला सुरुवात झाली. सप्ताहामध्ये ८ दिवस हरिकीर्तन, तसेच नवीन उपक्रम म्हणून मानव संसाधन विकास अंतर्गत निरनिराळ्या विषयांवर दररोज व्याख्याने होत आहेत. यावर्षीपासून छत्रपती युवा मंडळाच्या पुढाकारातून सप्ताहामध्ये नवीन उपक्रमांचे आयोजन म्हणून मानव संसाधन विकासांतर्गत निरनिराळ्या विषयांवरील व्याख्यानांची सुरुवात झाली आहे, गारगुंडी गावाचे नाव ज्यांनी जगभरात गाजवले अशा गावातीलच उद्योगपती, तसेच निरनिराळ्या क्षेत्रात चमकलेल्यांची व्याख्याने सप्ताहामध्ये दररोज होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांमधून गारगुंडीकरांनी समाजासमोर वेगळाच आदर्श घालून दिला आहे याबरोबरच आम्ही गारगुंडीकर या व्हाट्सअँप ग्रुप ने गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सप्ताह समिती व छत्रपती युवा मंडळाने केले आहे.










