श्रीगोंदा - शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी घोडवरुन पाणीपुरवठा मंत्री बबनराव पाचपुते यांनी घोडवरु...
श्रीगोंदा - शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी घोडवरुन पाणीपुरवठा मंत्री बबनराव पाचपुते यांनी घोडवरुन पाणीपुरवठा योजना सुरु करण्याचा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय मैलाचा दगड ठरेल. शहरवासीयांसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा अशा आनंदाचा आहे असे प्रतिपादन बाबासाहेब भोस यांनी केले. घोड धरणावरुन सुमारे 49 कोटी रु. खर्चुन सुरु केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन कार्य़क्रम राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते व जि.प.सदस्य प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते संपन्न झाला तद्नंतर झालेल्या कार्यक्रमात भोस बोलत होते. पाणी प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल पाचपुते यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भोस पुढे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने पाचपुते यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सलग काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. तर पाचपुते यांनीही या संधीचे सोने करुन घेतले. शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या व विकासासाठी सर्वात महत्वाचा असलेला घटक म्हणजे पाणी. याचा दूरदृष्टीने विचार करुन पाचपुतेंनी विशेष प्रय़त्न करुन निधी मिळवून देऊन घोडवरुन पाणी पुरवठा योजना कार्य़ान्वित केली. ऐन दुष्काळात शहरातील जनतेला केवळ दिलासा देण्याचे काम केले नाही तर या योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. या कामाद्वारे पाचपुतेंनी जनतेच्या ऋणातून काही अंशी का होईना उतराई करण्याचा प्रय़त्न केला आहे. विकासाची व कामाची चाड असलेल्या पाचपुतेंना जनेतेने पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पोपटराव खेतमाळीस, मनोहर पोटे, अरुण हिरडे, विठ्ठल काकडे, भरतकुमार नहाटा, बाळासाहेब महाडीक, प्रतिभा पाचपुते, नंदकुमार बोरुडे, आनंदकर आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्य़क्रमास सुवर्णाताई पाचपुते, ज्ञानदेव म्हस्के, भालचंद्र घोडके, एकनाथ आळेकर, डॉ.अनिल घोडके, अशोक आळेकर, दादासाहेब औटी, बापूसाहेब गोरे, सतिष मखरे, मच्छिंद्र शिंदे, राजु गोरे, मुकुंद सोनटक्के, संगीता मखरे,सुनिता शिंदे, मधुकर झोबोले, अशोक बगाडे, संतोष क्षिरसागर, लक्ष्मण नलगे, दत्ता हिरगवाळे, साखरबाई घोडके, सयाबाई सुपेकर आदींसह शहर व परिसरातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार शिंदे यांनी केले तर नगराध्यक्ष छायाताई गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्रीगोंदा शहराच्यावतीने केला गेलेला हा नागरी सत्कार आम्हाला स्मरणात राहील. श्रीगोंदा शहर हे पाण्याबाबत राज्यात सर्वात श्रीमंत म्हणून गणले जाईल. तर विकास कामासाठी आम्ही नेहमी जनतेबरोबर राहू अशी ग्वाही बबनराव पाचपुते यांनी यावेळी दिली.










