नगर- हिंद सेवा मंडळाच्या निवडणुक ही धर्मयुद्ध समजून लढलो. सभासदांनी हिंद सेवा पॅनेलला मतदानही केले, मात्र आमचा पराभव झाला. सभासदांनी दि...
नगर- हिंद सेवा मंडळाच्या निवडणुक ही धर्मयुद्ध समजून लढलो. सभासदांनी हिंद सेवा पॅनेलला मतदानही केले, मात्र आमचा पराभव झाला. सभासदांनी दिलेला कौल मान्य करुन यापुढील काळातही हिंद सेवा मंडळाचे काम करणार आहे. आयुष्यातील 60 वर्षे हिंद सेवा मंडळाच्या कारभारात घातली आहेत. म्हणून यापुढील आयुष्यही मंडळाच्या चांगल्या कामासाठी वेचू व सहकार्य करु. वसंत लोढा यांच्या माध्यमातून हिंद सेवा पॅनेलचा एक प्रतिनिधी निवडणुकीत विजयी झाला आहे. एक झटणारा नेता, विजय झाल्याने वसंत लोढा हिंद सेवा मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवतील. निवडणुकीत पॅनेलचा पराभव झाला आहे, मात्र वसंत लोढा यांचा विजयी झाला आहे. सिंह आला पण गड गेला अशी उपमा या निकालाला देता येईल, असे प्रतिपादन प्रा.मधुसूदन मुळे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या हिंद सेवा मंडळाच्या निवडणुक लढलेले हिंद सेवा पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बैठक़ घेण्यात आली. या बैठकीत पॅनेलमधून एकमेव निवडून गेलेले वसंत लोढा यांचा सर्वांनी सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी प्रा.मुळे बोलत होते. यावेळी अविनाश आपटे, ऍड.अच्युत पिंगळे, प्रकाश पोखरणा, सुहास मुळे, शिरिष रायते, नंदलाल मनियार, महेंद्र लोढा, सागर गांधी, सौ.निलमणी गांधी, महेश कुलकर्णी, श्रीरामपुरचे भरत कुंकलोळ, संजय छल्लारे, दत्तात्रय साबळे, कांतीलाल गांधी, सारंग बोरा आदि उपस्थित होते.










