पिंपरी जलसेन - मातृभाषेतील शिक्षण अत्यंत महत्वाचे असून मातृभाषेच्या प्रसारासाठी शिक्षकांना समाजाने सहकार्य करून शाळेच्या प्रगतीचा आ...
पिंपरी जलसेन - मातृभाषेतील शिक्षण अत्यंत महत्वाचे असून मातृभाषेच्या प्रसारासाठी शिक्षकांना समाजाने सहकार्य करून शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवावा असे आवाहन नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पठान यांनी केले. पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद शाळचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी भिमाजी मूळे यांच्या सेवापुर्ती समरंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. पठान बोलत होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच लहुजी थोरात हे होते. प्रमुख पाहुने म्हणून नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पठान, शिक्षक नेते रा.या. औटी, देविभोयारेचे सरपंच शिवाजी जाधव, भाउसाहेब डेरे, रावसाहेब रोहोकले, वडझिरेचे केंद्रप्रमुख श्री. नरसाळे साहेब , त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच , सर्व ग्रामस्थ पिंपरी जलसेन,वडझिरे केंद्रातिल शिक्षक व इतर मान्यवर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त डॉ .भाऊसाहेब कदम यांचे मोफत नेत्रतपासणी शिबीर
मुख्याध्यापक श्री शिवाजी भीमाजी मुळे यांच्या सेवापुर्तिनिमित्त पिंपरी जलसेनचे सुपुत्र व या शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. भाउसाहेब कदम यांनी यावेळी मोफत नेत्रतपासणी शिबिर भरवले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला.










