नगर - जैनाचार्य जगवल्लभ सुरीजींनी महामंत्र - मांगलिक दिले. आणि धर्माचार्यांनी प्रतिष्ठा विधीस शुभमुहर्तावर प्रारंभ केला.श्री आदेश्र्वर भ...
नगर - जैनाचार्य जगवल्लभ सुरीजींनी महामंत्र - मांगलिक दिले. आणि धर्माचार्यांनी प्रतिष्ठा विधीस शुभमुहर्तावर प्रारंभ केला.श्री आदेश्र्वर भगवान, श्री वासुपुज्य भगवान आणि 60 जिनमुर्तीची प्रतिष्ठा संपन्न झाली. उंच शिखरावर जैनधर्म ध्वजा दिमाखात कली, सोनेरी कलशाने लघु शत्रुंजय चमकले आणि भाविकांनी नमो जिणाष... जैतम् जयती शासनम चा जयघोष केला..
बुधवारी सकाळीच भाविकांच्या प्रचंड उत्साहात गुजर गल्लीतील जैन मंदीराची प्रतिष्ठा संपन्न झाली. 7.35 वाजता पुज्य आचार्य जगवल्लभ सुरीजी, पुज्य आ.हर्षवल्लभ सुरीजी, आणि जिर्णोद्धाराचे शिल्पकार पंन्यास दर्शनवल्लभजी अन्य साधु-साध्वीजी महराज चतुर्विध संघासह वाजत गाजत मंदीरात आले आणि प्रतिष्ठा विधीस प्रारंभ झाला.
आदेश्वर दादा आणि वासुपुज्य भगवानांची प्रतिष्ठा या भव्य मंदिरात झाली. आता आपल्या मन मंदीरात भगवानांची स्थाना झाली पाहिजे, आपण मनापासुन भगवानांशी एकरुप झालो तरच भगवान आपल्याशी एकरुप होतील. भक्तीभावाने प्रभुला साद घालणार्या सेवा-पुजा करणार्या भक्ताचा उद्धार परमेश्र्वर निश्चित करतो.मात्र त्यासाठी केवल जन्माने जैन असून चालणार नाही तर आपल्यात जैनत्व असले पाहिजे. अशा शब्दात त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी स्वागत केले.









