नगर- एकात्किक पाणलोट कर्मचारी संघटनेच्या कर्मचार्यांनी विविध मागण्यांकरीता कृषी अधिक्षकांच्या कार्यालयात संप पुकारुन आंदोनल सुरु केले आ...
नगर- एकात्किक पाणलोट कर्मचारी संघटनेच्या कर्मचार्यांनी विविध मागण्यांकरीता कृषी अधिक्षकांच्या कार्यालयात संप पुकारुन आंदोनल सुरु केले आहे. जिल्ह्यामधील 96 कर्मचारी पाणलोट विकास पथक सदस्य म्हणून काम करत आहे. मात्र कृषी खात्याच्या वतीने त्यांना अंत्यत तुच्छ पद्धतीचे वागणुक देण्यात येते. परिक्षा मुलाखत घेवुन या कर्मचार्यांची नियुक्त केली असली तरी पुन्हा परिक्षा देण्यासाठी बोलवले जात आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अशी पद्धत कोठेही नाही. कृषी विभाग मनमानी कारभार करत असून पाणलोट कर्मचार्यांना घरी जाण्यासाठी भाग पाडत आहेत. तसेच मिळणारा पगारही अनियमित असून मंजुरी पेक्षा कमी पगार हातात पडत आहे. त्यामुळे या कर्मचार्यांनी आंदोलन सुरु केले आहे.या समस्यांमुळे एकात्मिक पाणलोट कर्मचारी संघटनेने कृषी भागात सुरु केलेले आंदोलनास भाजपाचे युवा नेते नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी या आंदोलन कर्त्यांची भेट घवुन त्यांना पाठींबा व्यक्त केला आहे. यावेळी सुवेंद्र गांधी यांनी सर्व आंदोलनकर्त्यांची भावना समजुन घेवुन तातडी मार्ग काढण्यासाठी सर्व आंदोलनकर्त्यां कर्मचार्यांसह पालकमंत्री राम शिंदे यांचे कलेक्टर कचेरी येथे भेट घेवुन निवेदन दिले. ना.शिंदे यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच सुवेंद्र गांधी यांनी सांगितले कि, खा.दिलीप गांधी यांच्या माध्यमातुन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची दिल्लीत भेट घेवुन या कर्मचार्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुराव करण्याचे आश्वासन दिले.










