नगर - भगवान वासुपुज्य स्वामींच्या पंचकल्याणक उत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. त्यातील पहिल्या च्यवन कल्याणकाचा प्रत्यक्ष व्यासपीठावर सो...
नगर - भगवान वासुपुज्य स्वामींच्या पंचकल्याणक उत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. त्यातील पहिल्या च्यवन कल्याणकाचा प्रत्यक्ष व्यासपीठावर सोहळा होता. पंचकल्याणकातील च्यवन, जन्म, दित्या हे कल्याणक आणि भगवानांचा विवाह सोहळा, राज्यभिषेक व्यासपीठावर लाईव्ह होणार असल्याने नगरकरांमध्ये याबाबत प्रचंड कुतुहूल होते. मात्र गुरुवारी जेव्हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा राजाच्या भुमिकेत मंदिराचे विश्वस्त लालचंद कासवा, राजाचे कोषाध्यक्ष म्हणून विश्वस्त आणि वर्धमानचे मालक चंपालाल मुथा तर सेनापतीच्या भुमिकेत चक्क मंदिराचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सराफ सुभाष मुथा व्यासपीठावर प्रकटले आणि उपस्थित या विश्वस्तांना या सोहळ्यातील मुख्य भुमिका (नाट्य रुपांतर) स्वत: करताना पाहून अक्षरश: अवाक् झाले. गेले दोन महिने या सोहळ्याची तयारी सुरु होती. मात्र पेढीवर बसून, प्रतिष्ठा महोत्सवाचे नियोजन करणारे विश्वस्त सांस्कृतिक कार्यक्रमातून भुमिका करणार याची कुणालाच माहिती नव्हती. गुरुवारी हे लक्षात आल्यावर सुभाष मुथांसह सर्वच विश्वस्तांवर अक्षरश: शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षावच झाला आता पुढचे चार दिवस हे विश्वस्त सर्वच कार्यक्रमात या भुमिका निभावणार असल्याचे प्रतिष्ठा महोत्सव प्रचार समितीचे प्रमुख सुधीर मेहता यांनी सांगितले. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन मेहता यांनी केले.









