Archive Pages Design$type=blogging

घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा अहमदनगर: सर्जेपुरा, तोफखाना भागातून जाणाऱ्या घार नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने मंगळवा...







घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

अहमदनगर: सर्जेपुरा, तोफखाना भागातून जाणाऱ्या घार नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने मंगळवारी हातोडा टाकला. दिवसभर सुरू असलेल्या मोहिमेत ७५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी राहिलेले २७ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त केले जाणार आहे. सुमारे ७० लाख रुपये खर्च करून या नाल्याचे नूतनीकरण सुरू असून अतिक्रमणे नूतनीकरणास अडथळा ठरत होती.
मंगलगेट, एस.टी वर्कशॉप, प्रियदर्शनी कॉम्पलेक्स, बागडपट्टी, पोलीस मुख्यालय भागातील पावसाचे पाणी घार नाल्यातून वाहत जाऊन दिल्लीगेट येथून ते सीना नदीला मिळते. तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांनी बाजारपेठेतील मोचीगल्ली, कापडबाजारातील अतिक्रमणे हटविली होती. त्यात विस्थापित झालेल्यांचे तात्पुरते पुनर्वसन घार नाल्याभोवती केले होते. मात्र विस्थापितांच्या बरोबरीने इतरही लोकांनी या जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे बांधले. त्यामुळे नाला कोंडला गेला. पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरू लागले. नगरसेवक अरीफ शेख यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ७० लाख रुपयांचा निधी घार नाला नूतनीकरणासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिला. त्याचे काम सुरू झाले. मात्र नाल्यावरील अतिक्रमणामुळे हे काम थांबले होते.
अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पथक संबोधी शाळेजवळ पोहचले. तेथून अतिक्रमणे पाडण्यास सुरूवात केली. संबोधी शाळा ते नवरंग व्यायामशाळेदरम्यान असलेल्या २८ आणि नवरंग व्यायामशाळा ते सारडा माध्यमिक विद्यालयापर्यंत असलेल्या ४७ व्यावसायिक गाळ्यावर हतोडा टाकत ते जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी सारडा माध्यमिक विद्यालयापासून पुढील २७ व्यावसायिक गाळे पाडले जाणार आहेत

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा
घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjlUA6cln1shkw0EnmNHMhw04vaDQdF-kKFoLKLbNHdUZtl0OzpBOKpn0TDA0LRTe6CxCO3Ns2s_PqcnIwbk0TiqAqEa_Qohqgh7j0J36NpqdwLGSRZnCkN1RSKfmi5FsTujbu7ZExadUWD/s320/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjlUA6cln1shkw0EnmNHMhw04vaDQdF-kKFoLKLbNHdUZtl0OzpBOKpn0TDA0LRTe6CxCO3Ns2s_PqcnIwbk0TiqAqEa_Qohqgh7j0J36NpqdwLGSRZnCkN1RSKfmi5FsTujbu7ZExadUWD/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_12.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_12.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago