सभापती पालवे मारहाण प्रकरण,आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको पाथर्डीचे पंचायत समितीचे सभापती संभाजीराव पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा...
सभापती पालवे मारहाण प्रकरण,आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको
पाथर्डीचे पंचायत समितीचे सभापती संभाजीराव पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्य आरोपींना पाठीशी घालणार्या प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवार (दि. ३१) रोजी नगर - औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे सर्वपक्षीय वंजारी समाज बांधव, जय भगवान महासंघ, शेतकरी क्रांतीकारी पक्ष, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, वंजारी क्रांतीसेना, आर.पी.आय अशा सर्व पक्षीय वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. २ तासानंतर सोनई पो. स्टे. चे निरीक्षक सचिन सानप यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण १0 दिवसात आरोपींना अटक करुन ३0७ कलम लावले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
, रविभुषण पालवे नी आपल्या भाषणात तीव्र शब्दात पोलिस प्रशासनाचा निषेध करीत आरोपींना पाठीशी घालणार्या राजकीय नेत्यांवर टिका केली आहे. सभापती पालवे ज्या पाणी चोरुन विकणार्या टॅँकर माफीयांना विरोध करीत होते त्यांनी पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रय▪असून पोलिसांवर दबाव आणून अटक कारवाई टाळीत असल्याचा जाहीर आरोप केला. दोन तास शांततामय वातावरणात भर उन्हात कार्यकर्ते, ग्रामस्थ रस्त्यावर बसून होते