निघोजमध्ये मोफत हृदयरोग, मधुमेह, नेत्र तपासणी शिबीर प्रतिनिधी : पारनेर (सागर आतकर) : संवाहक संघटक, सिप्ला फार्मा, ...
निघोजमध्ये मोफत हृदयरोग, मधुमेह, नेत्र तपासणी शिबीर
प्रतिनिधी : पारनेर (सागर आतकर) : संवाहक संघटक, सिप्ला फार्मा, शिंदे हॉस्पिटल, विघनहर्ता व ममता नर्सिंग होम निघोज यांच्या विद्यमाने मोफत हृदयरोग,मधुमेह व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ३०२ पेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आले.उदघाटन आदर्श शिक्षक कारभारी बाबर गुरुजी व पारनेर बार आसोसिएशनचे तसेच माजी उपाध्यक्ष अँड.सुनील मेसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शिबिरात डॉ.अमित सकरिया,ममता नर्सिंग होमचे डॉ.सुधीर निचित,डॉ. परमेश्वर काळे(एम डि(मेडीसिन),डॉ.संजय शिंदे(नेत्र तज्ज्ञ),डॉ. योगेश राहाकडे आदींनी रुग्णांवर उपचार केले.
विनोद लोढा, राजू भुकन, सुरेश खोडदे,पंढरीनाथ घावटे, एकनाथ शेटे, अक्षय उनवने, बाबू झिंजाड, डॉ. अनिल निचित, केशव शिंदे, संतोष लंके, अमोल भुजबळ, दीपक वरखडे, निलेश घोडे, सागर आतकर, विशाल लामखडे, धनाजी मावळे,भैरवनाथ पतसंसंस्थेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब लामखडे,सामाजिक कार्यकर्ते मनोहर राऊत, बाळासाहेब लंके, यकुबशेठ तांबोळी, विष्णू लोखंडे, सोपानराव भाकरे, नामदेव रसाळ,शंकर भांबरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी सूत्रसंचालन विनोद लोढा, राजू भुकन यांनी केले ,तर डॉ. अनिल निचित यांनी आभार मानले.













