शिरूर मधे 'कन्यारत्न' चित्रपटाचे चित्रीकरण मुलगी वाचवा- देश घडवा या भूमिकेचे साकारणार दर्शन पिंपरी जलसेन (वार्ताहर) मुल...
शिरूर मधे 'कन्यारत्न' चित्रपटाचे चित्रीकरण
मुलगी वाचवा- देश घडवा या भूमिकेचे साकारणार दर्शन
पिंपरी जलसेन (वार्ताहर)
मुलगी वाचवा देश घडवा या देशव्यापी भुमिकेचे दर्शन मराठी चित्रपटाद्वारे करण्याकरता लोकसहभागातुन निर्मिती होत असलेल्या कार्तिक फिल्म प्रस्तुत "कन्यारत्न " या चित्रपटाचे चिञीकरण नुकतेच पुर्ण झाले.
या चिञपटात अभिनेत्री आरती सारगंधर, अभिनेता मिलिंद शिंदे, तेजा देवकर, रोहन दोलताडे, सुरेखा कुडची, बालकलाकार समृद्धी, कार्तिक, हर्षदा, कोमल व वैष्णवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चिञपटाची निर्मिती डी.गोवर्धन व दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. शिरूर तालुक्यातील करंदीगाव व परिसरात या चित्रपटाचे चिञीकरण झाले. मुलींच्या अंतरमनाचा शोध घेणारा हा आगळा वेगळा चिञपट असल्याचे निर्माता डी. गोवर्धन यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रातील सामाजिक व जाणकार लोकांचा सहभाग यात असावा व "मुलगी वाचवा " याबाबत जनजागृति विशेषता खेड्यापाड्यात व्हावी यांकरता हा चित्रपट लवकरच राज्याला अर्पण करणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. या चिञपटाचे विशेष म्हणजे लोकसहभागाबरोबरच राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले या चित्रपटात मुख्यमंञ्याच्या भुमिकेत दिसणार आहेत. सोबत रासपा अध्यक्ष महादेव जाणकर, रासपा महासचिव बाबासाहेब दोलताडे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे सरचिटणीस संजय पाटील, तसेच पारनेर तालुक्यातील कुरुंद गावचे " पञकार निलेश शेंडगे " यांच्याही यात भुमिका असणार आहेत!...










