पिंपरी जलसेन । वार्ताहर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विविध मागन्यांसाठी राज्यमंत्री अन्नाम यांना निवेदन पिंपरी जलसेन । वार्ताहर...
![]() |
| पिंपरी जलसेन । वार्ताहर |
पिंपरी जलसेन । वार्ताहर
पारनेर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाबाबत व सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतिने राज्यमंत्री अंबरीश राजे अन्नाम यांना विविध मागन्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यमंत्री अन्नाम यांचा नुकताच पारनेर तालुक्यात दुष्काळी दौरा पार पडला. यावेळी हे निवेदन देण्यात आले.
पारनेर तालुक्यातील आदिवाशी मुलांचे व मुलींचे वसतिगृहाची इमारत ेही सध्या खासगी जागेत असून त्या ठिकाणी मुला-मुलींना सोयी सुविधा पुरवन्यास अड़चन होत आहे. तरी या दोन्ही वस्तिग्रुहांना शासकीय जागेत इमारत बांधून मिळावी. व त्याचप्रमाणे दुष्काळ ग्रस्थ भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तातडीने परत मिळावे या मागन्यांचे निवेदन राज्यमंत्री अंबरीश राजे अन्नाम यांना पारनेर तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष राजू पानमंद व पार्नेर शहरमंत्री महेश ठुबे यांनी पारनेर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नासंधर्भात राज्यामंत्री अन्नाम याच्याशी चर्चाकेली. यावेळी अन्नाम यांनी सकारात्मक चर्चा योग्य ते संकेत दिल्याचे प्रा. राजू पानमंद यांनी सांगीतले. तसेच भाजपा पारनेर तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आनन्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचेही पानमंद यांनी सांगितले.
यावेळी अक्षय चे डे,शुभम भालेकर, योगेश बुगे, स्वप्निल नवले तसेच निघोज शहर शाखेचे शहर मंत्री वैभव गाडिलकर, मिनिनाथ ईरोले, पारनेर तालुका प्रमुख गनेश लंके, अमर भंडारी, संचित भालेकर, संदेश घोगरे, अविनाश जागदाले, भास्कर लंके, वैभव सरोदे, निखिल ढवळ, रोहित गागरे, राहुल शेटे आदिंसह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते










