जेऊरच्या देवी बायजामाता मंदिरातील दानपेट्या फोडल्या? नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर येथील बायजाबाई देवी मंदिरातील दानपेट्या फोडल्याची घटना घड...
नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर येथील बायजाबाई देवी मंदिरातील दानपेट्या फोडल्याची घटना घडली. मात्र, यात किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे; परंतु यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेबाबत जेऊरच्या नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत नागरिकांच्या चर्चेतून समजलेली सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथे देवी बायजामातेचे मंदिर आहे. या मंदिरात वैशाखी पौर्णिमेनिमित्त मागील आठवड्यात शनिवार, रविवार आणि सोमवार असे दिवस यात्रा भरविण्यात आली होती. दरम्यान्, शनिवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास मंदिरातील दानपेट्या फोडल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. या मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून दानपेट्या चावीने उघडण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याचे पोलिस कर्मचारी सांगितले. मात्र, या संदर्भात कोणीही फिर्याद दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही मंदिरातील घंटा चोरीचा प्रकार घडला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत जेऊर येथे पोलिस चौकी असून, पोलिस कर्मचार्यांनी या घटनेला दुजोरा दिला असलातरी गावकर्यांकडून कोणतीही तक्रार अथवा फिर्याद एकआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही. या घटनेबाबत जेऊरच्या नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून्, दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे










