खासदार गांधींच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी बसथांबा मंजूर प्रतिनिधी:पारने र : श्री. मुलिकादेवी विद्यालय, महाविद्यालय व ज्य...
खासदार गांधींच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी बसथांबा मंजूर
प्रतिनिधी:पारनेर :
श्री. मुलिकादेवी विद्यालय, महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजसाठी खासदार दिलीप गांधी यांच्या विशेष प्रयत्नातून एसटी बसथांब्याची मागणी पूर्ण झाली असून खासदार दिलीप गांधी यांनी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पारनेर तालुकाध्यक्ष गणेश लंके यांनी दिली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसथांबा व्हावा अशी मागणी निघोज येथील विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संघटना करीत होत्या. निघोज येथील महाविद्यालयात आसपासच्या गावातून विदयार्थी येत असतात, कॉलेज सुटल्यानंतर त्यांना बसची उन्हात वाट पहावी लागते, या विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या हि तीन हजाराच्या आसपास आहे. या महाविद्यालयात वडनेर, जवळा, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव,वडगावगुंड,देवीभोयरे, पिंपरी जलसेंन या गावांमधून विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात,म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणचा बस थांबा हा सोईचा आहे. तसेच विद्यार्थ्यांचे ऊन,वारा, पाऊस यांचा त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी अत्याधुनिक बसथांबा उभारण्याचे काम लवकरच सुरु होणार असून यासाठी खासदार गांधी यांनी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचा पाठपुरावा विध्यार्थी परिषदेचे निघोज शहरप्रमुख रोहित कोल्हे,वैभव गाडिलकर,राजू पाणमंद, अविनाश जगदाळे,अमोल साठे,राहुल शेटे,साई ढवण, अमोल जाधव,मिनींनाथ इरोळे, वैभव सरडे,आकाश लुढे, राहुल ढवण, अमोल कवाद,लहू गाडीलकर, आकाश शिंदे,दिनेश आडलिंगें, अविनाश येवले,स्वप्नील कोल्हे,भास्कर लंके,निलेश जगदाळे प्रशांत लाळगे, विशाल गाडीलकर,निखिल ढवळे, आनिकेत भुकन,संदेश घोगरे,निलेश घोगरे आदींनी पाठपुरावा केला. तालुकाध्यक्ष गणेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांचे शिस्टमंडळ खासदार गांधी यांना भेटून हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आणले आहे. या बद्दल विद्यार्थी व ग्रामस्थांनी खासदार गांधी याचे आभार मानले










