देविभोयरे येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी देवीभोयरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व संयुक्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला....
देविभोयरे येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
देवीभोयरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व संयुक्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी झेंडा वंदना करण्यात आले. दुपारी महिलांसाठी व लहान मुलांच्या खेळाच्या स्पर्धा पार पडल्या.
संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आांबेडकर, भगवान गौतम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर होते. या काय्रक्रमास प्रमुख पाहुणो म्हणून निघोजचे माजी उपसरपंच उमेश सोनवणो, सोमनाथभाऊ वरखडे, भाजपा सरचिटणिस पोपटराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव बेलोटे, भाजपा ता. सरचिटणिस डॉ. अजित लंके, सोसायटी चेअरमन अशोक मुळे, विश्वनाथ गाजरे, बंडू गायकवाड, अजित बेलोटे,जालिंदर गायकवाड, सुरेश गायकवाड, नवृत्ती साळवे, दादाभाऊ गायकवाड, श्री.कवाद सर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. आभार अमित जाधव यांनी मानले. त्यानंतर 'मदमस्त अफसरा' हा ऑर्केस्ट्राचा काय्रक्रम झाला
| . |










