गटई कामगारांचे प्रश्न सोडवू : आ. जगताप अहमदनगर : गटई कामगार हा कष्ट करणारा कामगार असून, त्यांच्या सर्वांगीण उन्नत्तीसाठी राष्ट्रीय चर...
अहमदनगर:गटई कामगार हा कष्ट करणारा कामगार असून, त्यांच्या सर्वांगीण उन्नत्तीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ कटिबद्ध आहे. गटई कामगारांसाठी विविध शासकीय योज़ना राबवून त्यांचे प्रश्न सोडविले ज़ातील,असे आश्वासन आ.संग्राम जगताप यांनी दिले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, नगर जिल्ह्याच्या वतीने गटई स्टॉल वीज मीटर कनेक्शनचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते दरपत्रकाचेही प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक सागर बोरुडे, कलावती शेळके, शोभाताई धस, रत्नमाला उद्मले, मनीषा पोटे, शिवाजीराव साळवे, जिल्हाध्यक्ष संजय खामकर, अँड़संतोष कांबळे, अर्जुन कांबळे, पांडुरंग काजळकर, पत्रकार सुभाष चिंधे, अभियंता परिमल निकम, बाळासाहेब कदम, संतोष त्रिबके आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना महापौर कळमकर म्हणाले की, गटई कामगारांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही त्यांच्यामागे उभे आहोत, त्यांचे प्रश्न आम्ही मनपाच्या माध्यमातून निश्चितच मार्गी लावू, त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करणो गरजेचे आहे. या वेळी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय खामकर यांनी केले. या वेळी गटई बांधवांसाठी अपघात विमा, अन्न सुरक्षा योजना, स्थल विमा, वीज़ मीटर, कायमस्वरुपी स्टॉलची जागा, मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नगरमध्येसुद्धा कायमस्वरुपी जागा मिळावी आदी माहिती देण्यात आली. प्रारंभी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आ.संग्राम जगताप व महापौर कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दरपत्रकाचे प्रकाशनही या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिद्धी व सिद्धी सातपुते यांनी चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा र पालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पुणो जिल्ह्याच्या निरिक्षकपदी संजय खामकर व शोभाताई धस,तसेच जिल्हा दक्षिण महिला आघाडीच्या प्रमुखपदी सौ.रत्नमाला उदमले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सज्रेराव गायकवाड, अरुण आहेर, रामराव ज्योती, अभिनव सर, राजेंद्र धस, तसेच युवा कार्यकर्ते विजय साळी, सचिन सोनवणो, गणोश नन्नवरे, विजय साळवे, मनीष कांबळे, विकी कबाडे, मनोज गवांदे, गोरख वाघमारे, संजय गुजर, अशोकराव शेवाळे, सातपुते सर आदींनी परिश्रम घेतले. |










