३० मे रोजी लागणार १२ वीचा निकाल पुणे, दि. २१ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या पर...
३० मे रोजी लागणार १२ वीचा निकाल
पुणे, दि. २१ - महाराष्ट्र राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, ३० मे रोजी लागणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर (ऑनलाइन) हा निकाल पाहता येईल, असे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान आज (२१ मे) सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची निकालाच उत्सुकता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली आहे.
दरम्यान यंदा दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेत नापास होणा-या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे.










