तलावातील गाळ काढण्यासाठी पत्रकार संघतर्फे मदत जामखेड: येथील भुतवडा तलावातील गाळ काढण्यासाठी जामखेड पत्रकार संघ. विश्वदर्शन केबल व शेतकरी...
तलावातील गाळ काढण्यासाठी पत्रकार संघतर्फे मदत
जामखेड: येथील भुतवडा तलावातील गाळ काढण्यासाठी जामखेड पत्रकार संघ. विश्वदर्शन केबल व शेतकरी मार्केट यांच्या वतीने 1 लाख, 11 हजार, 111 रुपयांचा निधी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या वेळी विश्वदर्शनचे संपादक गुलाब जांभळे म्हणाले, जामखेड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. भुतवडा तलावतील गाळ काढल्यास शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही; यासाठी सर्वांनी आर्थिक योगदान देण्याची गरज़ आहे. या वेळी शेतकरी मार्केटचे संतोष पवार, जामखेड पत्रकार संघाचे संस्थापक नासीर पठाण, वसंत सानप, पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शेख, अविनाश बोधले, ओंकार दळवी, अशोक निमोणकर, मोहिद्दिन तांबोळी, सुदाम वराट, रियाज शेख, किरण रेडे, नंदू परदेशी, संजय वारभोग, प्रेस फोटोग्राफर अशोक वीर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.










