Archive Pages Design$type=blogging

पाथर्डीतील अठरा गावांना दहा दिवसांतून एकदा पाणी

पाण्यासाठी नागरिकांचे हाल पाथर्डीतील अठरा गावांना दहा दिवसांतून एकदा पाणी पाथर्डी :जायकवाडी पाणी योजनेवर अवलंबून असणार्‍या पाथर्डी व अठर...


पाण्यासाठी नागरिकांचे हाल पाथर्डीतील अठरा गावांना दहा दिवसांतून एकदा पाणी
पाथर्डी :जायकवाडी पाणी योजनेवर अवलंबून असणार्‍या पाथर्डी व अठरा गावांना दहा दिवसांतून एकवेळ पाणी मिळते.उन्हाळ्याचा कहर चालू असताना जनतेला पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. पाच हजार लिटरचा टँकर हजार ते अकराशे रुपयांना विकला ज़ात आहे. पालिका पदाधिकारी व अधिकारी योजनेतील त्रूटी कमी करण्याचा प्रय▪करीत आहेत.मात्र, सध्या ही योजना कधी बंद पडेल, हे सांगता येत नाही.शहरात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. दहा दिवसांतून एकवेळ पाणी मिळते.काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी कमी प्रमाणात मिळते.पालिकेत दिवसाआड पाण्यासाठी महिला मोर्चा घेऊन येतात. नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे ,गटविकास अधिकारी डॉ.अरुण हरिश्‍चंद्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी करून उद्भवावर आणखी चार मडपंप बसविण्याची मागणी केली आहे. शेवगावला जाऊन पाहणी केली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवशंकर राजळे या वेळी उपस्थित होते.जिल्हाधिकार्‍यांकडे मडपंप बसविण्यासाठी आणखी निधीची मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवू,असे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागातील अठरा गावांना याच योजनेतून पाणी मिळते.त्या गावातही दहा ते पंधरा दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.योजना असल्यामुळे टँकर मंज़ूर होत नाही. पाण्यासाठी जनतेला वनवन भटकावे लागत आहे. पालिका पाणी योजनेसाठी काही करू शकत नाही.जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नाही.योजनाचा उद्भव बदलण्याची गरज आहे.त्यासाठी साधारणपणो पाच ते सहा कोटींचा खर्च आहे. हा निधी कोणी व कोणत्या योजनेतून द्यावयाचा, असा कळीचा प्रश्न आहे.यासाठी पालिका पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे आग्रह धरला पाहिज्े, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.यावर्षीची पाणी टंचाई भीषण आहे.जनता टंचाईच्या काळात हातघाईवर आली आहे.पाणी मिळावे, अशी मागणी शहर व ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पाथर्डीतील अठरा गावांना दहा दिवसांतून एकदा पाणी
पाथर्डीतील अठरा गावांना दहा दिवसांतून एकदा पाणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdwk_9ajOJJynpResD3XlykrfkGdVjbd4GFE29GVoUWp-yEVIKPBOQxmuFxTBqnVTVp8mOkthdfaMY5k10cHDaLdCFyF2l53mkd4AwyhUJOBDf1_ersWX6Qe5udeKOu65K1RXA3eTBXsYa/s1600/12424.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdwk_9ajOJJynpResD3XlykrfkGdVjbd4GFE29GVoUWp-yEVIKPBOQxmuFxTBqnVTVp8mOkthdfaMY5k10cHDaLdCFyF2l53mkd4AwyhUJOBDf1_ersWX6Qe5udeKOu65K1RXA3eTBXsYa/s72-c/12424.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_57.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_57.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago