शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रप्रदर्शन नगर - शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रकार योगेश हराळे अहमदनगर प्रे...
शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रप्रदर्शन
नगर - शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रकार योगेश हराळे अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने एेतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २८, २९ मे रोजी सकाळी १० ते रात्री पर्यंत सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख चित्रकार हराळे यांनी बुधवारी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी अनिल कवडे, बद्रिनाथ तनपुरे महाराज, आमदार अरुण जगताप संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, मनपा आयुक्त दिलीप गावडे, उपायुक्त अजय चारठाणकर, शरद तोडमल, ज्येष्ठ पत्रकार इतिहासाचे अभ्यासक श्रीपाद मिरीकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नगर - शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रकार योगेश हराळे अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने एेतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २८, २९ मे रोजी सकाळी १० ते रात्री पर्यंत सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख चित्रकार हराळे यांनी बुधवारी दिली.
या प्रदर्शनात भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, भिंगारचे शुक्लेश्वर मंदिर, भातोडीचे नृसिंह मंदिर, अवतार मेहेरबाबांची समाधी, दमडी मशीद, पारशी अग्यारी, ह्यूम मेमोरियल चर्च, राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराजांची समाधी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, चौथे शिवाजी महाराजांची समाधी, रणगाडा संग्रहालय, वस्तुसंग्रहालय, कुकडे वाडा, रेव्हरंड ना. वा. टिळकांची समाधी, कापूरवाडीचा तलाव अशा ५१ स्थळांचे दर्शन घडेल. त्यांची माहितीही सोबत असेल. जगभरातील विविध अांतरराष्ट्रीय संग्रहालयांत असलेली १८ व्या १९ व्या शतकातील दुर्मिळ छायाचित्रेही या प्रदर्शनात पहायला मिळतील.










