महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली वेगवान अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या ...
महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली वेगवान
अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली आतापासूनच वेगवान झाल्या असून आघाडीच्या तीन नाराज नगरसेवकांवर सेनेची मदार कायम आहे. सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी गुप्त बैठकांना वेग आला आहे. युती व आघाडीकडून अजूनपर्यंत तरी महापौर पदी कोण? याची निश्चिती झालेली नाही.
महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ जूनअखेर संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच नवीन महापौर पदाची निवडणूक होणार आहे. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने महापालिकेवर भगवा फडकवायचा, असा चंग सेनेने बांधला आहे. सेनेकडे सुनीता भगवान फुलसौंदर, अनिता राजेंद्र राठोड, सुरेखा संभाजी कदम हे महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यादृष्टीने कदम, फुलसौंदर, राठोड, अनिल शिंदे हे नगरसेवकांची जुळवाजुळव करीत आहेत़ जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे, कॉँग्रेसचे संजय लोंढे, मुद्दसर शेख सेनेच्या गळाला लागले होते. महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहून तिघांनी सेनेला मदत केली होती. आताही या तिघांवरच सेनेची मदार आहे. किशोर डागवाले, पोटनिवडणुकीत योगीराज गाडे यांची वाढलेली एक जागा आणि सेनेचे १८ अशा वीस नगरसेवक सेनेकडे आहे. अपक्ष नगरसेविका उषा शरद ठाणगे या सेनेच्या गोटात गणल्या जात आहेत. भाजपचे ९ आणि आघाडीचे ३ नाराज असे ३३ नगरसेवक सेनेकडे होते. त्याच जोरावर सेनेकडून महापौर पदासाठी कस लावला जात आहे.
आघाडीकडून कॉँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर, राष्ट्रवादीच्या नीता घुले, आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप या तिघांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत.