महापालिकेत राजकीय हालचालींना वेग नगर : आगामी महापौर पदासाठीची निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपल्याने, महापालिकेत राजकीय हालचालींना आता वे...
महापालिकेत राजकीय हालचालींना वेग
नगर : आगामी महापौर पदासाठीची निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपल्याने, महापालिकेत राजकीय हालचालींना आता वेग येऊ लागला आहे. शिवसेना-भाजपाने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. तर दुसरीकडे आघाडी वरवर थंड दिसत असलीतरी, सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी अंतर्गत हालचाली जोरात सुरू आहेत. महापौरपदासाठी सेनेने कंबर कसली असून, उमेदवार मातोश्रीवरून निश्चित होणार आहे. तर आमदार जगताप द्वयी ठरवतील त्यांच्या गळ्यात आघाडीकडून उमेदवारीची माळ पडणार आहे.
आगामी महापौर-उपमहापौर निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती कायम राहणार हे निश्चित आहे. महापौरपदासाठी शिवसेनेने अनेक दिवसांपासून कंबर कसली असून, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता ताब्यात घ्यायचीच असा चंग बांधला आहे. त्यासाठी सेना-भाजपाच्या नेतेमंडळींमध्ये प्राथमिक स्थरावर चर्चेच्या एकदोन फेर्याही झाल्या आहेत. महापालिकेतील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे सत्ता मिळण्याची आशा निर्माण झाल्याने, युतीकडून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. युतीतील सत्तेच्या भागीदारीनुसार महापौरपद सेनेला तर उपमहापौरपद भाजपाला मिळणार आहे. त्यादृष्टीने लवकरच दोन्ही पक्षाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापौरपदासाठी शिवसेनेकडून शहरप्रमुख संभाजी कदम यांची पत्नी सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांची पत्नी सुनिता फुलसौंदर व स्थायी समितीच्या माजी सभापती अनिता राठोड इच्छुक आहेत. मात्र, आता राठोड यांनी उमेदवारी करण्याबाबत असमर्थता दर्शविल्याने कदम आणि फुलसौंदर या दोघीच उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. त्यातही कदम यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेचा महापौरपदाचा उमेदवार ङ्गमातोश्रीफवरून निश्चित होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. आहे. दरम्यान, भाजपाकडून उपमहापौरपदासाठी खा.दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
आ. अरूण जगताप व आ. संग्राम जगताप ठरवतील, त्यास आघाडीकडून महापौरपदाची उमेदवारी मिळेल, हे निश्चित आहे. या पदासाठी विद्यमान उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या नावाची चर्चा असलीतरी, सद्यस्थितीत त्या उमेदवारी करण्याची शक्यता नाही. शिक्षा झाल्याने भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर तुरूंगात असल्याने निवडणुकीत लागणारी ङ्गताकदफ त्यांच्यामागे नाही. स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांची पत्नी निता घुले यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे आता आघाडीकडून आ. अरूण जगताप यांच्या स्नुषा व आ. संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप यांचेच नाव चर्चेत आलेले आहे.
गेल्या अडीच वर्षांत झालेल्या विविध राजकीय घडामोडींमुळे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस-काँगे्रस आघाडीचे संख्याबळ बर्याच प्रमाणात घटले आहे. तर दुसरीकडे विरोधी युतीचे संख्याबळ वाढले आहे. दोन्ही बाजूंकडे आज समान संख्याबळ असल्याने एक महिन्याने होणार्या महापौरपदाच्या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच रंगण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत धुसफूस असतानाही महापालिकेची सत्ता पुन्हा काबिज करण्याचे स्वप्न शिवसेना रंगवित आहे. मात्र, आमदार जगतापद्वयींच्या व्यूहरचनेसमोर त्यांचा निभाव लागणार का, याबाबत आतापासूनच उत्सुकता लागलेली आहे.