पारनेरच्या दुष्काळी व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणार:ना.आत्राम पारनेर :पारनेरच्या दुष्काळी व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या ज़...
|
पारनेरच्या दुष्काळी व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणार:ना.आत्राम
पारनेर :पारनेरच्या दुष्काळी व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या ज़ातील,असे आश्वासन आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिश राजे आत्राम यांनी दिले. पारनेर तालुक्यातील निघोज येथे निघोज परिसर कृषी फलोद्यान या संस्थेस भेट दिली असता,ना. अत्राम बोलत होते. अध्यक्षस्थानी निघोज परिसर कृषी फलोद्यानचे संस्थापक अध्यक्ष व निघोज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद होते. ना. अत्राम पुढे म्हणाले, पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकर्यांच्या व्यथा ज़ाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला पारनेरचा दुष्काळी दौरा करण्यास सांगितले असून, शेतकर्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात येईल. या वेळी कवाद यांनी दुष्काळी प्रश्नावर चर्चा करून पाण्याखालील कमांडमधील गावे जलयुक्त शिवारात घ्यावीत, शेतकर्यांना कांदा, डाळिंब फळबागांना नुकसान भरपाई मिळावी. कमांडमधील गावांची आणोवारी ५0 पैशांपेक्षा कमी लावावी,अशी मागणी कवाद व निघोजचे सरपंच ठकाराम या वेळी केली. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव कवाद, पोपटराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे व पोपटराव लोंढे, वसंतराव चेडे, उद्योजक अमृता रसाळ, माजी सरपंच व निघोज परिसर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, काशिनाथ नवले, रामदास नरड, राज़ू पानमंद, निघोज नागरी पतसंसथेचे व्हा.चेअरमन नामदेव थोरात, मोहन खराडे, मनोहर राऊत, संतोष रसाळ, महेश ढवळे, जगदाळे सर, नाना राऊत, खंडू इधाटे, भाऊसाहेब वरखडे, डॉ.महेंद्र झावरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास वरखडे यांनी केले. आभार निघोज परिसर फलोद्यानचे व्यवस्थापक रवींद्र रसाळ यांनी मानले. |










