माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव कालवश पुणे, दि. २७ - मराठीतील प्रख्यात समीक्षक, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा...
पुणे, दि. २७ - मराठीतील प्रख्यात समीक्षक, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा.ग. जाधवयांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी सहा वाजत पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी १२.३०च्या सुमारास जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठीतील प्रख्यात समीक्षक असलेल्या प्रा. जाधव यांनी जाधव यांनी समीक्षा, कविता तसेच ललित लेखनही केले. स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर ते १० वर्ष प्राध्यापकी पेशात कार्यरत होते. ३७ काव्यसंग्रहांचे परिक्षण लिहीणारे जाधव तसेच १८५० ते २००० काळातील मराठी नवकवितांवरील प्रयोग ह्यावर परिसंवादातही सहभागी होते. याशिवाय मराठी विश्वकोषातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २० वर्षे जबाबदारी सांभाळली.
तसेच औरंगाबाद येथील २००४ साली झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही जाधव यांनी भूषवले असून ते मराठी साहित्य परिषदेचेही अध्यक्ष होते.
राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप असते