वडझिरे येथे भागवत कथेस सुरुवात पारनेर : प्रतिनिधी वडझिरे येथे रविवार दि.२२ पासून श्रीमद भागवत कथा भक्तीज्ञानामृत सोहळ्यास उत्साहात सुरुवा...
वडझिरे येथे भागवत कथेस सुरुवात
पारनेर : प्रतिनिधी
वडझिरे येथे रविवार दि.२२ पासून श्रीमद भागवत कथा भक्तीज्ञानामृत सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.वडझिरे मधील अध्यात्म प्रबोधन संस्था,वडझिरे इंग्लिश मीडियम स्कूल व ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.वडझिरे इंग्लिश मीडियम स्कूल च्या मैदानावर हा सोहळा सुरु असून त्यास भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे.रविवारी दुपारी चार वाजता भागवत ग्रंथाची विठ्ठल मंदिरापासून मिरवणूक काढून कथा स्थळा पर्यंत नेण्यात आली. तिथे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेशजी लंके यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व वडझिरे गावचे सरपंच शिवाजीराव औटी यांचे हस्ते कलश पूजन करण्यात आले,बाजार समिती संचालक वसंतराव मोरे याचे हस्ते प्रतिमा पूजन,रामलिंग पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव गंधाक्ते यांचे हस्ते ग्रंथपूजन व सोसायटीचे उपाध्यक्ष भास्करमामा बोरकर यांच्या हस्ते व्यासपूजन करण्यात आले.ह.भ.प. हनुमान महाराज थोरात यांच्या रसाळ वाणीतून दररोज संध्याकाळी ६ ते ६ कथा निरूपण होत आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते ,अन्नदानासाठी दानशूरांचे सहकार्य लाभले आहे.रविवार दि २९रोजी ह.भ.प. हनुमान महाराज थोरात यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. कार्यक्रमचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे









